
ग्रामीण भागातील अनुदानित शाळा संपवण्याचा इरादा, राज्यातील हजारो शाळा बंद होणार, शिक्षक संघटनेचा आरोप.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाला संपूर्ण राज्यभरातून विरोध होत असताना देखील शिक्षण विभागाने सन २०२४-२५ ची संच मान्यता या शासन निर्णय प्रमाणेच तयार केली असल्याचे समजते. यामुळे राज्यातील हजारो शाळा बंद होणार आहेत. हा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करून ०८ जानेवारी २०१६ च्या शासन निर्णयाातील मुद्दा क्र. ३ प्रमाणे अंमलबजावणी न केल्यास रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ रस्त्यावर उतरून शिक्षण विभागाविरोधात आंदोलन करणार असल्याचे अध्यक्ष सागर पाटील यांनी स्पष्ट केले.शालेय शिक्षण विभागाच्या १५ मार्च २०२४ च्या शासन वर्गात २० विद्यार्थी असणे आवश्यक आहे.
या वर्गाची विद्यार्थी संख्या २० पेक्षा कमी झाल्यास एकही शिक्षक नववी-दहावी या गटासाठी मंजूर करण्याची तरूद या शासन निर्णयात नाही. यामुळे नववी व दहावीच्या वर्गांना शिकवायला एकही शिक्षक नसेल तर शाळा कशी चालवायची हा प्रश्न संस्थाचालकांसमोर निर्माण होणार आहे.www.konkantoday.com