मित्राला मोबाईलवर जीवन संपवत आहे असा मेसेज टाकून कुडाळ मध्ये पोलीस कॉन्स्टेबलची गळफास लावून आत्महत्या


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत सूरज अनंत पवार (31, रा. मळगाव-कुंभार्लीवाडी, ता. सावंतवाडी, सध्या रा. रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्स, केळबाईवाडी, कुडाळ) यांनी गळफास घेऊन जीवन संपविले.त्यांचा मृतदेह ते राहत असलेल्या कॉम्प्लेक्समधील फ्लॅटमध्ये सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अस्वस्थेत आढळून आला. तपासाअंती सूरज यांनी जीवन संपविले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी दुपारी 3.45 वा. दरम्यानची ही घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कुडाळ पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सूरज पवार हे कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. चार महिन्यांपूर्वी आवळेगाव आऊटपोस्ट येथून ते कुडाळ पोलिस ठाण्यात हजर झाले होते. कुडाळमधील रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्समध्ये एकटेच राहत होते. सोमवारी दुपारी त्याच्या मित्राच्या मोबाईलवर त्यांनी ‘तुला कुडाळला यावेच लागेल, मी जीवन संपवीत आहे’ अशा आशयाचा मेसेज टाकला. त्या मित्राने याची कल्पना त्यांच्या मळगाव येथील भावाला दिली. ते तातडीने कुडाळला आले. तो राहत असलेल्या फ्लॅटवर गेले असता दरवाजाला बाहेरून लॉक लावले होते. परंतु, किल्ली बाहेर ठेवल्याचे सूरजने मेसेजमध्ये म्हटले होते. त्यामुळे भावाने किल्लीद्वारे दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता सूरज हे पंख्याला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button