
रत्नागिरी जिल्हा वासियांनी गुढीपाडव्याच्या या मुहूर्तावर विविध ७६३ नव्या वाहनांची खरेदी केली.
गुढीपाडव्याचा मुहूर्तावर जिल्ह्यात तब्बल ७६३ वाहनांची खरेदी झाली.यामध्ये ५५२ दुचाकी, १०० कार, रिक्षा आणि मालवाहतूक वाहनांचा समावेश आहे. या वाहनांच्या नोंदणी शुल्कातून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला सुमारे पावणेपाच कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.गुढीपाडव्याचे औचित्य साधून वाहनांची खरेदीही मोठ्या प्रमाणावर झाली.
गुढीपाडव्याच्या या मुहूर्तावर जिल्ह्यात विविध ७६३ नव्या वाहनांची खरेदी झाल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झालेल्या नोंदणीवरून स्पष्ट झाले. यापैकी दुचाकींची संख्या तब्बल ५५२ इतकी आहे. तर त्याखालोखाल कारची संख्या १०० आहे. तसेच रिक्षा आणि मालवाहतूक वाहनांची संख्याही अधिक आहे. या ७६३ वाहनांच्या नोंदणीपोटी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला विविध करांच्या माध्यमातून ४ कोटी ७६ लाख ३८ हजार २४६ एवढा महसूल मिळाला आहे.