
मतदारसंघातील कामासंदर्भातच महसूल मंत्र्यांच्या गाठीभेटी ः खासदार सुनिल तटकरे यांचा खुलासा
रायगड ः रायगड-रत्नागिरीचे राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांनी चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या बंगल्यावर भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते परंतु आपण रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदार संघातील विकास कामांसंदर्भात आपण महसूलमंत्री यांची भेट घेतली. आपण केवळ महसूलमंत्र्यांनाच भेटलो नाही तर इतर चार मंत्र्यांनाही भेटलो. त्यामध्ये शिवसेनेचेही मंत्री होते. दापोली येथील कुणबी समाज संघाला जागा मिळण्यासाठी आपण तसेच गुहागर, दापोली, खेड, मंडणगड येथील हायब्र्रीड ऍन्युट्यूमधील रस्त्याबाबतही त्यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत मी जी कामे करण्याची आश्वासने दिली होती त्याची पूर्तता करण्यासाठी आपण पर्यटनमंत्री जयकुमार रावल, शिवसेनेचे राज्यमंत्री दादासाहेब भुसे व अन्य सचिवांची आपण भेट घेतली होती. आपल्या भेटीसंदर्भात अफवा उठविल्या जात असून आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझी निष्ठा व माझे विचार शरद पवार यांचे बरोबरोच आहेत. राष्ट्रवादी कॉंग्र्रेस पार्टी फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com




