
राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीवर गोवळ व विलयेच्या पूल बांधणीच्या कामाला तब्बल २५ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी
आमदार किरण सामंत यांनी मानले रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री, माजी केंद्री मंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे आभार
*राजापूर :- *दि.१ एप्रिल २०२५* रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीवर गोवळ व विलये दरम्यान मोठा पुल बांधण्यासाठी २५ कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.हा निधी मिळवून देण्यासाठी रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय उद्योगमंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी मदत केल्याने त्यांचे आमदार किरण सामंत यांनी आभार मानले आहेत.
देशाला स्वातंत्र्य मिळवून ही अर्जुना नदीवर गोवळ व विलये या गावांना जोडणारा पूल नव्हता मात्र आमदार किरण सामंत यांनी ही बाब लक्षात घेऊन या पुलासाठी पाठपुरावा सुरू केला.या पुलामुळे या गावातील लोकांना फायदा होणार आहेच मात्र येथील पंचक्रोशीला मोठा फायदा होणार आहे.आमदार किरण सामंत यांनी या रस्त्याला निधी मिळून दिल्या बद्दल रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे आभार मानले.




