मशिदीत स्फोट करणाऱ्यांवर दहशतवादाचं कलम का नाही? पोलिसांच्या फतव्यावर भडकले इम्तियाज जलील!

बीड जिल्ह्यातील गेवराईमधील अर्धामसला गावातील मशिदीत काल मध्यरात्रीच्या सुमारास दोन तरुणांनी स्फोट घडवून आणल्याची खळबळजनक घटना घडली होती. हे दहशतवादी कृत्य करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी तातडीनं अटक केली. रमजान ईदच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्यानं परिसरात तणावाची स्थिती होती.*याच घटनेवर आता एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भाष्य केलं आहे. या दोघा गुन्हेगारांवर दहशतवादाचं कलम का लावलं नाही? असा सवाल करत पोलिसांच्या फतव्यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.जलील म्हणाले, सकाळी सात वाजताच मी पोलिसांशी बोललो, मला याचं समाधान आहे की, पोलीस कर्मचारी हे ताबडतोब घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपीला अटक केली.

या आरोपींवर सर्व कलम लावण्यात आली आहेत. पण जेव्हा मी एफआयआर पाहिली तेव्हा मी पोलिसांना विचारलं की, तुम्ही स्फोट घडवून आणल्याचं कलम लावलं पण दहशतवादी कृत्याचं कलम का लावलं नाही? हीच घटना मुस्लिमांनी केली असती तर ताबडतोब त्याचं घर पाडलं असतं बुलडोझर फिरवले असते. त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना बाहेर काढलं असतं.कोणी जर चुकीचं कृत्य केलं असेल तर त्यावर कारवाई करायला हवी, अन्यथा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात काय फरक राहील? माझ्या घराच्या टेरेसवर मी नमाज पडू शकत नसेल तर कोण आहे तो हलकट पोलीसवाला जो अशा प्रकारे आदेश काढतो? या देशात काही कायदे कानून आहेत की नाही? माझ्या घरात काय करायचं हे मी ठरवणार.उत्तर प्रदेशात भीतीचं वातावरण निर्माण केलं असून त्या विरोधात कोणी बोललं की आता तुरुंगात टाकायचं असं सध्या सुरु आहे. पण मी बोलणार, उत्तर प्रदेशात घाणेरडं राजनीती सुरू आहे ते महाराष्ट्रात आणू नका. तुम्ही जी बुलडोझरची संस्कृती आणि कायदे आणत आहात याचा आम्ही विरोध करत आहोत. तुम्हाला बुलडोझरचा कायदा आणायचा असेल तर न्यायालयांना कुलूपं लावा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, इम्तियाज जलील यांनी यावेळी रमजान महिन्याचं महत्व देखील विशद केलं. त्यांनी म्हटलं की, रमजानचा महिना म्हणजे आपण किती सहन करायचं हे शिकायला मिळतं. आज देशात आणि राज्यात जे सुरू आहे, त्यातही सहनशील राहा. आता रमजान संपला असला तरी त्याची भावना आपल्याला पुढं न्यायची आहे.मी सर्वांना सांगतो की ही वेळ निघून जाईल, थोडं सहन करा, थोडं सांभाळून घ्या. आता आपली वेळ आहे असं ज्यांना वाटतं, त्यांना माहित नाही जी गोष्ट वर जाते तीच खाली पण येते. जे वर गेले आहेत त्यांना सुद्धा वाट पाहावी लागेल खाली येण्याची आणि ते खाली येणारच नक्की.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button