
राजापुरची समृद्धी नार्वेकर बनली महिला न्यायाधीश
राजापुरातील समृद्धी प्रशांत नार्वेकर या युवतीने बारावीनंतर कोल्हापुरातील शहाजी लॉ कॉलेजमध्ये ५ वर्षे बॅचरल ऑफ सोशल लॉचे शिक्षण घेवून पुढे २ वर्षात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रवर्ग या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. राजापूर तालुक्यात अशाप्रकारे न्यायाधीश होणारी ही पहिली महिला ठरली आहे. या परीक्षेसाठी बसलेल्या ११४ विद्यार्थ्यांत समृद्धीने राज्यात पहिला क्रमांक पटकावला. राजापुरातील सुवर्णकार असलेल्या प्रशांत व प्रेरणा नार्वेकर यांची समृद्धी ही सुकन्या आहे. समृद्धी हिचे प्राथ. व माध्यमिक शिक्षण राजापुरात झाले. राजापुरातील नॅशनल इंग्लिश स्कूलमधून ती दहावी झाली. त्यानंतर ती नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राजापूर येथून बारावी परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर तिने कोल्हापुरातील शहाजी लॉ कॉलेजमध्ये ५ वर्षे बॅचरल ऑफ सोशल लॉसाठी प्रवेश घेतला.
येथे ५ वर्र्षे शिक्षण घेत ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. त्यानंतर ती दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या परीक्षेसाठी तयारी करत परीक्षा दिली होती. या कालावधीत तिने राजापुरातील विधीज्ञ ऍड. मिलिंद चव्हाण यांच्याकडे क्रिमिनल केससाठी प्रॅक्टीसही केली. प्रारंभी ही प्रिलियम त्यानंतर मेन्स व त्यानंतर इंटरव्ह्यू अशाप्रकारे परीक्षा दिल्या होत्या. शनिवारी तिने दिलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा निकाल जाहीर झाला यात समृद्धी हिने बाजी मारली आहे.www.konkantoday.com