
चिपळूण शहरात चिपळूण नगरपालिकेने केली ५०० भटक्या कुत्र्यांची नसबंदी.
गेल्या महिनाभरात चिपळूण नगर परिषदेने पुणे येथील पेटस फोर्स संस्थेच्या माध्यमातून शहरातील ५०० भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली आहे. यासाठी सुमारे १० लाख रुपये खर्च झाला.गेल्या काही वर्षापासून शहरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यातच मध्यंतरी शहरातील वडनाका व पागझरी परिसरात भटक्या कुत्र्यांनी बालकांवर हल्ले केले. त्यामुळे भीती निर्माण झाली होती.
यावर उपाय म्हणून नगर परिषदेने ५०० कुत्र्यांची नसबंदी व त्यांना रेबीज लस देण्याचा निर्णय घेतला. त्याचा ठेका पुणे येथील वरील संस्थेने घेतला आहे. त्यानुसार गेल्या महिनाभरापासून संस्थेच्या कर्मचार्यांनी शहरात फिरून कुत्र्यांना पकडून अग्निशमन इमारतीत केलेल्या खास कक्षात आणले. तेथे वैद्यकीय अधिकार्यांनी या कुत्र्यांची नसबंदी केली. त्यानुसार ही मोहीम फत्ते झाली आहे. www.konkantoday.com




