
माडावरून नारळ काढताना पडल्याने तरूणाचा मृत्यू
. खेड तालुक्यातील दयाळ-काझरकोंड येथे माडावरून पडून गंभीररित्या जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नितीन शांताराम झाडेकर (३२, रा. कुंभवे सुतारवाडी, दापोली) असे मृत तरूणाचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तो २५ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घराशेजारी असलेल्या माडावरील नारळ काढत होता. यावेळी अचानक तोल गेल्याने तो खाली पडला. उपचारासाठी त्याला दापोली येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.www.konkantoday.com