
भीषण भूकंपात म्यानमारमधील ‘सुवर्ण पॅगोडा’ उद्ध्वस्त
म्यानमारमध्ये आलेल्या ७.७ तीव्रतेच्या भयानक भूकंपाने देशात मोठं नुकसान झाले आहे. आतापर्यंत मृतकांचा आकडा समोर आला नाही. या भीषण भूकंपामुळे मांडले येथील महामुनी पॅगोडा उद्ध्वस्त झाला आहे.२०१६ मध्येही भूकंपामुळे पॅगोडाचं नुकसान झालं होते. भारत सरकारने २०२० साली म्यानमारमधील या नुकसानग्रस्त भूकंपाच्या जिर्णोद्धारासाठी मदत केली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हा प्रकल्प पूर्ण केला होता.
महामुनी बुद्ध मंदिर नावाने ओळखलं जाणारा हा पॅगोडा म्यानमारमधील प्रमुख तीर्थ स्थळ आहे. संध्याकाळी इथला नजारा अद्भूत असतो. हे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते परंतु ते पुन्हा एकदा कोसळलं आहे. मांडले महामुनी बुद्ध प्रतिमा म्यानमारशिवाय बौद्ध धर्माला मानणारे लोकांसाठी पवित्र आणि पूजनीय ठिकाण होते. सकाळ, संध्याकाळ मोठ्या संख्येने पर्यटक येथे यायचे. २०१६ च्या भूकंपावेळीही मांडलेतील महामुनी पॅगोडा उद्ध्वस्त झाला होता. त्यानंतर भारत सरकारच्या मदतीने ते पुन्हा उभारण्यात आले.