
कोकणात फळप्रक्रिया उद्योग झाले तर कोकणी माणसाला मुंबईवर अवलंबून रहावे लागणार नाही -रामदासभाई कदम
कोकणामध्ये नैसर्गिकरित्या होणार्या फळांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली, तर कोकणातील माणसांना मुंबईवर अवलंबून रहावं लागणार नाही. या फळांवर प्रक्रिया करणे गरजेचे असून यापुढील काळात त्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून त्यासाठी कोकण कृषि विद्यापीठाचे योगदान गरजेचे असल्याचे मत माजी मंत्री व शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी व्यक्त केले.
जामगे येथे हाती घेण्यात आलेल्या कोल्ड स्टोअरेजच्या अनुषंगाने कोकणातील उत्पादीत होणार्या फळे आणि भाज्या यांना दर्जेदार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यावर आधारित फळांचा रस, जेली, चॉकलेट इत्यादी फळप्रक्रिया उद्योगांवर आधारित व्यवसाय निर्माण व्हावा आणि या अनुषंगानेच शिवसेना नेते, माजी मंत्री ना. रामदासभाई कदम यांनी कोकण कृषि विद्यापीठ येथे भेट देवून कुलगुरू, तसेच उद्यान विद्या विभाग, अर्थशास्त्र विभाग, फूड प्रोसेसिंग विभाग इत्यादी विभाग अधिकार्यांसोबत विशेष बैठक घेवून या विषयासंदर्भात सविस्तर चर्चा घडवून आणली. या उद्योग व्यवसायासाठी लागणारी सर्वतोपरी सहकार्य विद्यापीठ स्तरावर करण्यासाठी महत्वाची भूमिका घ्यावी, अशा सूचना रामदासभाई कदम यांनी अधिकारी वर्गाला केल्या.www.konkantoday.com