
फडणवीसांना केवळ सत्तेचा माज आणि मस्ती; विरोधी पक्षनेते पदावरून भास्कर जाधव भडकले.
राज्याच्या विधान सभेच्या विरोधी पक्षनेते पद रिक्त असल्याने सरकारवर प्रचंड टीका होत आहे. त्यावरून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव भडकल्याचं पाहायला मिळालं.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.जाधव म्हणाले की, ज्यांना घटना लोकशाही विधिमंडळ मान्य नाही. ज्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे. ज्यांच्याकडे सत्तेची मस्ती आहे. त्यांच्याकडून लोकशाहीची सभ्यता राखणे, रक्षण करणे हे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवण योग्य नाही. असं जाधव म्हणाले.त्यांच्याकडून आजपर्यंत अपेक्षा होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा खूप मोठा विश्वास होता. त्यांचा संसदीय कार्यप्रणाली, संसदीय कार्यावर प्रचंड प्रेम करणारे आहेत. असं माझं मत आहे. त्याबद्दल मला आदर आहे, आस्था आहे.
आजही मला आस्था आहे, जरी त्यांनी मला पद दिलं नाही तरीते सातत्याने सांगत होते की, आमची संख्या जास्त आहे की कमी आहे याचा विचार करणार नाही.मला असं वाटलं होतं की ते एकप्रकारचा संकेत देत आहेत. भास्करराव शांत रहा, शेवटच्या दिवसापर्यंत करू असं म्हणाले होते. पण मला खात्री झाली आहे की, त्यांना घटनेवर त्यांचा विश्वास नाही. केवळ सत्तेचा माज आणि मस्ती यांच्या डोक्यात आहे. घाऊक पक्ष विकत घ्यायचे त्यांच्याकडून अपेक्षा नाही. उपाध्यक्षपदाची निवड करता, मग विरोधीपक्ष नेतेपदाची निवड करता आली असती. सभागृहात नियमात बोलणं, प्रथा परंपरेचा मान ठेवणं हे चुकीचं असेल तर मी हजार वेळा करेन. अशी टीका जाधव यांनी केली.