
ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या नूतन वास्तु चा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न
आज रत्नागिरी दौऱ्यावर असताना स्वामी स्वरूपानंद पतसंस्था, नूतन वास्तूचा भूमीपूजन कार्यक्रम राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या शुभप्रसंगी कुदळ मारून नूतन वास्तूचे भूमीपूजन मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले.स्वामी स्वरूपानंद पतसंस्था ही माझ्या मतदारसंघात असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. त्यांच्या कार्याची उंची व आदर्श सहकार क्षेत्रातील योगदानाचा गौरव करावा तितका कमी आहे. आता पाच मजली इमारत उभारून संस्था नवी उंची गाठत आहे, हे निश्चितच प्रेरणादायक आहे.
संपूर्ण महाराष्ट्र फिरताना सहकार क्षेत्रातील ताकद आणि योगदान नेहमीच प्रकर्षाने जाणवते. सहकार क्षेत्राच्या विकासासाठी आणि संस्थेच्या यशासाठी अशा पुढाकारांचे योगदान नेहमीच प्रेरणादायी ठरेल, असे यावेळी बोलताना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.या कार्यक्रमाला स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. दिपक पटवर्धन, विभाग संघ संचालक श्री. दत्ताजी सोलकर, उपाध्यक्ष श्री. माधव गोगटे, श्री. संतोष प्रभू, श्री. जयप्रकाश पाखरे, श्री. राजेंद्र सावंत, श्री. अजित रानडे, श्री. प्रसाद जोशी यांसह कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
