
शासकीय मुहूर्ता ऐवजी मच्छिमार पारंपरिक मुहूर्त साधणार
कोकणात सध्या मुसळधार पावसाने जोर केला असून मोठा प्रमाणावर वादळी वारे वाहत असल्याने समुद्र खवळला आहे. यामुळे मच्छीमारांसाठी मासेमारीसाठी असलेली शासकीय बंदी १ऑगस्ट रोजी उठणार असली तरी समुद्रातील धोकादायक परिस्थितीमुळे मच्छिमार पारंपरिक म्हणजे नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर सुरुवात करतील अशी चिन्हे आहेत. पावसाळा हा मच्छीच्या प्रजननाचा काळ असल्याने शासनाने दोन महिने मच्छिमारीवर बंदी घातलेली होती. रत्नागिरी जिल्ह्यात अंदाजे चार हजार मच्छीमारी बोटी आहेत.
www.konkantoday.com