
कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल होणारी प्रकरणे रत्नागिरी न्यायालयात चालणार
कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल होणारी प्रकरणे रत्नागिरी न्यायालयात चालवण्यात येणार आहे. २० फेब्रुवारी २०२५ पासूनचे रिमांड काम व नव्याने दाखल होणारे दोषारोपपत्र सर्वप्रथम मुख्य न्यायदंडाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे दाखल होवून रत्नागिरी न्यार्यदंडाधिकारी वर्ग-१ यांच्या न्यायालयात निकाली होतील.
निकाली प्रकरणांचे अपिल कार्यक्षेत्र सत्र न्यायालय रत्नागिरी असेल, अशी माहिती जिल्हा न्यायालय रत्नागिरी यांच्याकडून देण्यात आली. कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे नव्याने सुरु करण्यात आले आहे. रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या अधिकारक्षेत्रात कोलाड, इंदापूर, माणगांव, गोरेगांवरोड, वीर, सापेबामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, खेड (पोलीसं दूरक्षेत्र), अंजणी, कळंबणी, चिपळूण, कामथे, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, कडवई, उक्षी, भोके, रत्नागिरी, निवसर, आडवली, वेरवली, विलवडे, सौंदळ, राजापूर रोड आदींचा समावेश असणार आहे. या अधिकारक्षेत्राच्या २७ पोलीस कार्यक्षेत्रांमध्ये भारतात व महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या रेल्वे ऍक्ट १९८९ व रेल्वे प्रोटेक्शन ऍक्ट १९६६ कायद्याप्रमाणे न्यायालयापुढे कामकाज चालणार आहे, असे जिल्हा न्यायालय रत्नागिरी यांच्याकडून सांगण्यात आले.www.konkantoday.com