
प्रताप सरनाईकच एसटी महामंडळाचे अध्यक्ष; CM फडणवीसांना निर्णय फिरवला.
प्रताप सरनाईकच एसटी महामंडळाचे अध्यक्ष; CM फडणवीसांना निर्णय फिरवला,आताही असाच एक प्रकार घडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलाच एक निर्णय महिन्याभरातच फिरवला आहे. यानुसार आता एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली होती. याआधी फडणवीसांनी अध्यक्षपदी परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांची नियुक्ती केली होती. त्यांच्या या माघारीनंतर शिंदे गटात फिलगुड वातावरण निर्माण झालं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही काळापुरते संजय सेठी यांची नियुक्ती केली होती, मात्र आता सरनाईक यांच्यावर पुन्हा ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी सरनाईक यांची नियुक्ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोणताही दुरावा नसल्याचा स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.