
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
मा.नामदार डॉ. उदयजी सामंत साहेब यांचे सहकार्याने *08 मार्च जागतिक महिला दिनाचे* औचित्य साधून आपल्या समाजातील काहि श्रमिक (घरेलु) महिला भगिनी काबाडकष्ट करून आपल्या संसाराचा कारभार यशस्वीपणे पार पाडत असतात. आपल्या मुलांना उत्तमपणे शिक्षण देत असतात. अशा सर्व महिला भगिनींचा सन्मान करण्यात येणार आहे.
या भगिनींसाठी *“क्षणभर विरंगुळा”* म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने विविध बक्षिसेही देण्यात येणार आहेत. तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त श्रमिक महिलांनी (घरेलू) उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा संघटक सौ.शिल्पाताई सुर्वे, शहर महिला प्रमुख सौ.स्मितलताई पावसकर, तालुका महिला प्रमुख सौ.कांचनताई नागवेकर व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.*स्थळ : स्वयंवर मंगल कार्यालय, माळनाका, रत्नागिरी**कार्यक्रमाची वेळ : दु. 3.00 ते 6.00*