रत्नागिरीतील धबधबे व समुद्र किनार्‍यावर प्रशासनाची करडी नजर

रत्नागिरी ः कोकणात पावसाळी आनंद लुटण्यासाठी विकेंडला भरपूर पर्यटक येतात. पर्यटकांची वर्दळ लक्षात घेवून जिल्ह्यातील धबधबे, समुद्र किनारे आदी भागात पोलीस यंत्रणेसह आपत्तीनिवारण पथकांनी दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिल्या आहेत.
पर्यटकांमध्ये खासकरून अन्य विभागातील पर्यटकांचा सहभाग असल्याने पाण्याच्या खोली व जोराचा अंदाज न आल्याने अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांचा प्रतिसाद असलेल्या धबधब्यांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. चुनाकोळवण, खोरनिंनको, सवतसडा, सवतकडा येथील धबधब्यांवर प्रशासनाने आपत्ती निवारण पथकाची सज्जता केली आहे. तसेच किनारी भागातही सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. या भागात सार्वजनिक ठिकाणी अथवा वाहन चालवताना मद्यप्राशन किंवा हुल्लडबाजी करणार्‍या पर्यटकांवर जागेवरच कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button