
वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी-इंडियाच्या (इस्त्रा) पथकाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील केळशी-उंटबर सागरी परिक्षेत्रात शार्क (मुशी) आणि गिटारफीश, पाकट प्रजाती मिळण्याचे ठिकाण म्हणून नामांकित केले.
भारतातील ५१ समुद्री मत्स्यप्रजाती लोप पावत असतानाच वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी-इंडियाच्या (इस्त्रा) पथकाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील केळशी-उंटबर सागरी परिक्षेत्रात शार्क (मुशी) आणि गिटारफीश, पाकट प्रजाती मिळण्याचे ठिकाण म्हणून नामांकित केले आहे.भारतातील काही समुद्री मत्स्यप्रजाती विलुप्तीच्या उंबरठ्यावर येऊन उभ्या राहिल्या आहेत. म्हणूनच आययुसीएनच्या शार्क स्पेशालिस्ट ग्रुपने आजवर १२५ क्षेत्रांना इस्त्राची ओळख दिली आहे. त्यामध्ये आता केळशी-उंटबर आणि मालवणच्या सागरी परिक्षेत्राचा समावेश केला आहे
.”इस्त्रा”ची प्रामुख्याने बंदरावर वाहून आलेल्या शार्क, पाकट आणि गिटारफिशची संख्या पाहून निरीक्षणं घेते. मच्छीमारांच्या जाळ्यांमध्ये अनावधानाने अडकलेले हे जीव मच्छीमारांकडून बंदरांवर आणले जातात. कोणत्या बंदरावर असे जीव वाहून आल्याची संख्या जास्त आहे, याचे सर्वेक्षण करून त्याची ओळख पटवण्याचे काम ”इस्त्रा” करते. दापोली तालुक्यातील केळशी-उंटबर या क्षेत्राची ओळख ”वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी-इंडिया”च्या टीमने केली आहे.