गोव्यासह 13 राज्यांत लवकरच ‘जलमेट्रो

गोव्यात येणार्‍या लाखो पर्यटकांना जादा सुविधा देण्यासह राज्यातील पर्यटन अधिकाधिक आकर्षक व्हावे, यासाठी राज्यात ‘जलमेट्रो’ सुरू करण्यासंदर्भात चाचपणी सुरू झाली असून यासाठी देशभरातील नद्यांचाही वापर करण्यात येणार आहे.देशातील 13 राज्यांमधील 17 शहरांमध्ये पूर्णतः अथवा अंशतः जलमेट्रो सुरू करण्यासंदर्भात तज्ज्ञांकडून अभ्यास चालू असून हा व्यवहार्यताविषयक अभ्यास करण्यासाठी कोची मेट्रो रेल्वे (केएमआरएल) या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यासह अयोध्या, कोलकाता, प्रयागराज, पाटणा, श्रीनगर, वाराणसी, मुंबई, वसई, मंगलोर, अहमदाबाद या शहरांची आणि जेथे बेटांतर्गत फेरीसेवांमुळे संपर्क व्यवस्थेत स्थित्यंतर घडून येऊ शकेल अशी केरळमधील अल्लेप्पी तसेच लक्षद्वीप तसेच अंदमान आणि निकोबार बेटांची निवड केली आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

शहराचा मुख्य भाग आणि परिसरातील महानगरपालिका,पंचायत क्षेत्रे, बेटे यांना ही शहरी जल वाहतूक प्रणाली जलमार्गाने जोडेल आणि या प्रणालीचे वाहतुकीच्या इतर मार्गांसोबत एकत्रिकरण देखील करण्यात येईल. तसेच ही प्रणाली पर्यटन आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला देखील चालना देईल.भारतीय आंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाच्या (आयडब्ल्यूएआय) संचालक मंडळाने त्यांच्या 196 व्या बैठकीत, देशातील विविध शहरांमध्ये शहरी, जलवाहतूक प्रणाली विकसित करण्यातील व्यवहार्यतेसंदर्भातील अभ्यास सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यात गोव्यात जलमेट्रो सुरू करण्याबाबत चाचपणी करण्याचे ठरले. मंडळाने देशातील 13 राज्यांमधील 17 शहरांमध्ये पूर्णतः अथवा अंशतः जल मेट्रो सुरू करण्याच्या शक्यतेचा शोध घेण्याचे ठरवले आहे. हा व्यवहार्यताविषयक अभ्यास करण्यासाठी कोची मेट्रो रेल्वे (केएमआरएल) या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button