
पक्षाला लागलेल्या गळतीवर उद्धव ठाकरे यांनी घेतली मातोश्रीवर बैठक.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळेस कोकणातील आणखी एक मोठा नेता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे विधान शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी केले होते.यावरून आता शिवसेना उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव जे ठाकरेंचा गट सोडत शिंदेंच्या गटात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. अशामध्ये शनिवारी (15 फेब्रुवारी) शिवसेना उबाठा गटातील नेत्यांची उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर पार पडली. यानंतर शिवसेना उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पक्षाला लागलेल्या गळतीवर खासकरून कोकणातील नेत्यांच्या नाराजीवर भाष्य केले.
कोकणातून एक काळ मुख्यमंत्री झालेले नारायण राणेदेखील पक्ष सोडून गेले होते. तरीही तिथे शिवसेना उभी राहिली. कोकणात त्यानंतरही अनेक खासदार आणि आमदार निवडून आले. निश्चितच पक्षातून चांगले लोकं बाहेर पडले हे मान्य करावे लागेल. पण तरीही हे लोकं जात असतील तरी संघटना यावरही मात करेल, हे निश्चित.” असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दर्शवला. आजपर्यंत अनेक पक्ष सोडून गेले असले तरी संघटना टिकून आहे. भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते असून त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली तरी ते पक्षावर नाराज नाहीत. त्यांच्यावर पक्षांच्या मोठ्या जबाबदाऱ्या आहे.” असे विधान अंबादास दानवे यांनी केले. “भास्कर जाधव यांच्याशी पक्ष प्रमुखांचा नेहमी संपर्क राहिला आहे.
आज ते व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला हजर होते,” असे त्यांनी स्पष्ट सांगितले. तसेच भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट होत असेल तर हे दुर्देवी आहे. सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका मांडली असून आता याला तडा जाणार आहे,” असेही ते म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर घेतलेल्या बैठकीला विनायक राऊत,अंबादास दानवे, संजय राऊत, अनिल परब, अरविंद सावंत आणि इतर काही नेते उपस्थित होते.