
शहरात राहूनही रत्नागिरीकर घेत आहेत धुळीचा व डोंगर चढ-उताराचा अनुभव.
ग्रामीण भागात गेलो तर आपल्याला डोंगराचे चढ रस्ते व काहीशा प्रमाणात धुळीचे रस्ते आढळून येतात. मात्र रत्नागिरीकर मात्र हा अनुभव सध्या शहरात राहूनही अनुभवत आहेत. रत्नागिरी शहरात मुख्य रस्त्याचे कॉंक्रीटीकरण सुरू असून सध्या जेल नाक्यापासून थिबापॅलेस ते पुढे मला नाक्याच्या पुढे एका बाजूने कॉंक्रीटीकरण सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर एकाबाजूने वाहतूक सुरू असून अनेकवेळेला वाहतुकीची कोंडी सोडवताना ट्रॅफीक पोलिसांच्या देखील नाकीनऊ येत आहेत. रत्नागिरीतील वाहनचालकांची मात्र आणखीनच दाणादाण उडाली असून आरटीओच्या लायसन मिळवण्यासाठी जेवढी परिक्षा द्यावी लागली नाही त्यापेक्षा जास्त परीक्षा या रस्त्यावरून दुचाकी हाकताना द्यावी लागत आहे.
शहरातील कॉंक्रीटीकरण करत असताना काही ठिकाणी पाईपलाईन पलिकडे नेण्यासाठी तो भाग वगळून कॉंक्रीटीकरण करण्यात आले आहे असे पॅचेस विविध भागात ठेवण्यात आले आहेत. मात्र हे करत असताना या नव्या कॉंक्रीटीकरणाच्या पॅचेसवर चढण्यासाठी कच्ची खडी व सिमेंट यांचा कच्चा भराव करण्यात येत आहे. मात्र सततच्या वाहतुकीमुळे हा भराव ढासळून खडी सगळीकडे पसरत आहे. त्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार वाढत आहेत.

याशिवाय भराव पसरला गेल्याने कॉंक्रीट केलेल्या भागावर दुचाकी चढवणे हे धोकादायक व त्रासदायक ठरत आहे. याशिवाय दुचाकी व अन्य वाहनानाही या रस्त्यावरून जाताना धक्के बसत आहेत. त्यामुळे हाडे खिळखिळी होण्याचे प्रकार घडत आहेत. शिवाय पांढऱ्या धुळीमुळे नागरिकांना हैरण व्हावे लागत आहे काँक्रिटीकरण रत्नागिरीकराच्या दृष्टीने पुढील काळात चांगले असले तरी नगरपरिषद प्रशासनाला नागरिकांना कमीत कमी त्रास देऊन त्यातून मार्ग काढता आला असतावास्तविक या ठिकाणी कच्चे डांबर खडी टाकून कॉंक्रीटच्या रस्त्यावर चढण्यासाठी भराव केले असते तर ते टिकावू झाले असते व वाहनचालकांनाही कमी त्रास झाला असता मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

रस्त्याचा एक पट्टा काँक्रिटीकरणाचा झाला असला तरी उरलेला उर्वरित भागाचे डांबरीकरण लांबत असल्याने नागरिकांना कसरत करतच दुचाकी व अन्य वाहने हा कावी लागत आहेत मात्र या महत्त्वाच्या प्रश्नाकडे नगरपरिषद प्रशासनाचे कोणतेही लक्ष नाही. राम नाक्याच्या चढावावर चव्हाण हॉस्पिटल ते एसटी स्टँड या भागात नगर परिषदेने नळपाईप योजनेचे पाईप टाकण्यासाठी खड्डे खोदले होते ते काम पूर्ण झाल्यावर त्याच्या भरावाची लेव्हल न केल्याने त्याचे दगड वर आलेले आहेत आधीच अरूंद असलेल्या रस्त्यावर दुचाकी वाहने चालवणे कठीण होत आहे.

एकेठिकाणी तर मोठा खड्डा असून नगर परिषद यंत्रणेकडून ते बुजविण्याबाबत कोणतीही तसदी घेतलेली नाही . विशेष म्हणजे आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी अनेक नगरसेवक व पक्ष इच्छूक असले तरी सर्वसामान्य लोकांना होणार्या त्रासाकडे व अडचणींकडे कोणीही लक्ष देत नसल्याने जनतेत नाराजी निर्माण झाली आहे. www.konkantoday.com
