
लाच स्वीकारल्याप्रकरणी कुडाळचा वनक्षेत्रपाल व क्लार्क ताब्यात
पाच हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी कुडाळचे वनक्षेत्रपाल व क्लार्क या दोघांना आज लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई आज दुपारी कुडाळ येथे करण्यात आली. प्रदिप गोविंदराव कोकितकर (वय ४०, रा. कुडाळ एमआयडीसी, मुळ रा. गडहिंग्लज) व रविंद्र भिकाजी भागवत (वय ५६, रा. कुडाळ, मुळ रा. तळेरे-दत्तमंदिरजवळ) असे त्यांचे नाव आहे.ही कारवाई तपासी अधिकारी दिपक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. कांबळे व श्री. केणी यांनी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे लाकूड व्यावसायिक असून त्यांनी झाडतोडीचा परवाना मिळण्यासाठी कुडाळ कार्यालयात प्रकरण सादर केले होते. मात्र हे प्रकरण मंजूर करण्यासाठी दोघांनी पाच हजार रुपये, दीड हजार रुपये व चार हजार रुपये अशी लाच मागितली होती. या प्रकरणी संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
www.konkantoday.com