
प्रवाशांच्या तक्रारी आणि वाहकांना होणारा त्रास लक्षात घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्वाचे पाऊल उचलले
प्रवाशांच्या तक्रारी आणि वाहकांना होणारा त्रास लक्षात घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी यासंबंधी प्रशासनाला काही सूचना दिल्या आहेत.सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नयेत यासाठी एसटीने प्रवाशांना यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून, मागील काही दिवसांपासून यूपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न ( दुपटीने वाढले आहे.
यासोबतच, महामंडळाने एक परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन म्हणून ₹100 पर्यंत सुट्टे पैसे उपलब्ध करून देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. यामुळे सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवासी यांच्यात होणारे वाद टाळण्यास मदत होईल.