
पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेसाठी चिरेखाणीचा उपयोग करून घ्यावा ः सामाजिक कार्यकर्ते आबा सुर्वे यांची मागणी
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चिर्यांच्या जुन्या खाणी आहेत. शासन एकीकडे पाणी अडवा व पाणी जिरवा ही मोहीम राबविण्यासाठी मोठमोठ्या तळ्यांची निर्मिती करत आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यात चिरे काढून झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर चिर्यांच्या खाणी रिकाम्या पडल्या आहेत. या खाणीचा उपयोग जर पाणी साठवण्याच्या दृष्टीने केला तर त्याचा उपयोग शेतकरी व अन्य जणांना होवू शकतो. याकडे जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून तशा सूचना ग्रामपंचायतीला द्याव्यात अशी मागणी सुर्वे यांनी केली आहे.
www.konkantoday.com