
रत्नागिरीचे 2 महाराष्ट्र नेवल युनिट देशामध्ये पहिला क्रमांकावर
एन सी सी नेवल विंग अंतर्गत सन 2025 मेनू स्पर्धेमध्ये रत्नागिरीचे 2 महाराष्ट्र नेवल युनिट रत्नागिरी या कार्यालयाने देशामध्ये पहिला क्रमांक पटकवून मोठे उज्वल यश संपादित केले आहे.5 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2024 या कालावधीत मेनू-25 शिबीर राबवण्यात आले होते. रत्नागिरी ते वरवडे, जयगड, तवसाळ, वोरीया या शिबीरासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून निवड झालेले पात्र कॅडेट सहभागी झाले होते.
त्यामध्ये एकूण 60 राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुला-मुलींचा सहभाग होता. शिबीराचे प्रमुख प्रशिक्षण मार्गदर्शन कमांडर के राजेश कुमार, समादेशक अधिकारी 2 महा नेवल युनिट एन सी सी रत्नागिरी यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली या चार वर्षात सलग तीनवेळा प्रथम तर एक वेळा दुसरा क्रमांक पटकावण्याचा मान मिळाला.
पी.एम रॅली न्यू दिल्ली येथे पार पडलेल्या 27 जानेवारी 2025 रोजी 2 महाराष्ट्र नेवल युनिट एन सी सी रत्नागिरी यांना देशात प्रथम क्रमांक घोषित करण्यात आला आहे.