महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारी रत्नागिरीतील 3 उपकेंद्रांवर परीक्षा

रत्नागिरी, दि. 31 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही रत्नागिरी तालुक्यातील गोगटे जोगळेकर महाविद्यालय लॉ कॉलेज, पटवर्धन हायस्कूल आणि फाटक हायस्कूल अशा तीन उपकेंद्रांवर होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.

या परीक्षेसाठी 1 हजार 196 उमेदवार परीक्षेस बसणार आहेत. त्यांच्या परीक्षेची बैठक व्यवस्था गोगटे जोगळेकर महाविद्यालय लॉ कॉलेज या उपकेंद्रावर RT001001 ते RT001360, पटवर्धन हायस्कूल येथे RT002001 ते RT002360 आणि फाटक हायस्कूल येथे RT003001 ते RT003476 अशी करण्यात आली आहे. आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा, गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकरणी संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. परीक्षांकरिता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रावर उमेदवाराची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेली सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button