
पेठकिल्ला येथील मंत्री नितेश राणे यांचा समाजकंटकाने हटवलेला बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पुन्हा लावला.
मत्स्य व्यवसाय आणि बंदर खाते मंत्री नितेश राणे यांच्या आदेशाने शहरातील मिरकरवाडा जेटीवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली होती. गेल्या 25 वर्षात जे साध्य झाले नाही ते अवघ्या वीस दिवसात झाल्यामुळे या परिसरात नितेश राणे यांच्या अभिनंदनचे बॅनर शहरात लावण्यात आले होते. त्यापैकी पेठकिल्ला परिसरातील एक बॅनर ३० जानेवारी रोजी समाजकंटकांनी हटवल्यामुळे भाजप आक्रमक झाली होती. आज ३१ जानेवारी रोजी सकाळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपने हटवलेल्या भागातील बॅनर पुन्हा लावला. मिरकरवाडा बंदराने अनेक वर्षांनंतर मोकळा श्वास घेतल्यामुळे आणि कोणाच्याही विरोधाला न जुमानता रोखठोक भूमिका घेत मंत्री नितेश राणे यांच्या आदेशाने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग आणि जिल्हा पोलीस दल यांच्या सहकार्याने हे अतिक्रमण हटविण्यात आले.
याबद्दल मंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदन आमचे बॅनर शहरात झळकले होते; मात्र काही समाजकंटकांनी पेठ किल्ला पाथरे बाग या भागातील एक बॅनर विद्रुप करून गायब केल्याची घटना काल (३० जानेवारी) सायंकाळच्या सुमारास घडली होती. ही घटना घडल्याचे लक्षात आल्यानंतर रात्री उशिरा भाजप कार्यकर्त्यांनी रत्नागिरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन या संदर्भात संबंधित समाजकंटकांचा शोध घ्यावा, तसेच या घटनेचा सखोल तपास व्हावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी बॅनर लावला जाईल असा निर्धारही यावेळी केला होता.त्यानुसार आज सकाळी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पुन्हा ठिकाणी मंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदनचा बॅनर पुन्हा एकदा लावण्यात आला.