
थर्ड पार्टी विमा घ्यावाच लागेल! अन्यथा मिळणार नाही पेट्रोल-डिझेल, फास्टॅगला करा लिंक!
नव्या नियमानुसार जर तुमच्याकडे थर्ड पार्टी विमा नसेल तर पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करता येणार नाही. इतकंच नाही तर फास्ट टॅगसाठीही तुम्हाला विम्याची कागदपत्रे दाखवावी लागतील. तुम्हाला तुमच्या गाडीचा थर्ड पार्टी विमा फास्टॅगला लिंक करावा लागेल. जर तुमच्याकडे थर्ड पार्टी विमा प्रूफ असेल तरच इंधन खरेदी करता येईल. इतर सुविधांचाही लाभ घेण्यासाठी थर्ड पार्टी विमा गरजेचा असेल. जर तुम्ही विम्याशिवाय गाडी चालवत असाल तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. सरकारने इंधन खरेदी, फास्टॅग, प्रदूषण आणि लायसन्स सर्टीफिकेट घेण्यासाठी वाहनांचा विमा दाखवणं बंधनकारक करण्यात आलंय.
भारतात सर्व वाहनांसाठी थर्ड पार्टी विमा बंधनकारक केला आहे. यात दुचाकी, चार चाकी वाहनांचा समावेश आहे. तुमच्याकडे कार किंवा दुचाकी असेल तर त्याचा विमा असणं आवश्यक आहे. आता थर्ड पार्टी विम्याशिवाय वाहन चालवणं बेकायदेशीर आहे. जर असं आढळून आलं तर दंडात्मक कारवाई केली जाईल.थर्ड पार्टी विमा असल्यास तुमच्या वाहनाच्या अपघातात त्रयस्थाचं नुकसान होणार नाही.
जर तुमच्या वाहनाचा अपघात झाला आणि त्रयस्थ व्यक्तीचं नुकसान झालं तर थर्ट पार्टी विम्यामुळे त्यालाही कव्हर मिळतं.मोटर वाहन कायद्यानुसार रस्त्यावर धावणाऱ्या सर्व वाहनांचे थर्ड पार्टी विमा कव्हरेज असायला हवं. सरकारने नवा विमा खरेदी करताना फास्टॅगला वैध थर्ड पार्टी विमा पॉलिसी जोडणं बंधनकारक केलंय. पेट्रोल पंपावर इंधन टाकताना आधी विमा पाहिला जाईल. फास्टॅग सिस्टिमच्या माध्यमातूनच हे सगळं चेक केलं जातं. त्यामुळे फास्टॅगला विमा लिंक करावा लागेल.