
रत्नागिरी शहरातील प्रस्तावित सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी ऐतिहासिक करार.
रत्नागिरी शहरातील प्रस्तावित सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी दावाेस येथे व्हीआयटी सेमीकंडक्टर कंपनीसाेबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 19 हजार 550 काेटींच्या ऐतिहासिक गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला आहे. हा प्रकार केवळ रत्नागिरीसाठीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे, अशी माहिती उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी दिली.या प्रकल्पामुळे आपण आत्मनिर्भर भारताच्या दिशेने माेठे पाऊल टाकत आहाेत. या गुंतवणुकीमुळे रत्नागिरीत हजाराे राेजगार निर्माण हाेती.
तरूणांना नवीन संधी मिळतील आणि आपल्या मतदारसंघाचा विकास झपाट्याने हाेईल, असे सामंत यांनी सांगितले.आपण मतदारसंघातील जनतेला दिलेल्या वचनाचे पालन केले आहे. यापुढेही रत्नागिरीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत कार्यरत राहीन. हा प्रकल्प आपणा सर्वांच्या सहकार्याशिवाय शक्य झाला नसता. हा केवळ माझ्या कामाचा विजय नाही तर जनतेचा विजय आहे.www.konkantoday.com