
दापोली तालुक्यातील दमामे वडाची वाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात ६ बकर्या फस्त.
दापोली तालुक्यातील दमामे वडाची वाडी येथील एका गरीब शेतकर्याने भरवस्तीत गुरांच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या बकर्यांपैकी ६ बकर्यांना बिबट्याने ठार मारल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घडल्या घटनेने त्या गरीब शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दापोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याने आपल्या वावराच्या संचाराची चांगलीच दहशत वाढवली आहे. गायी, वासरे, गुरांसह बकर्यांना बिबट्या लक्ष्य करत आहे. पाळीव प्राण्यांवरील बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाळीव प्राणी गंभीर जखमी होवून गतप्राण होत आहेत. यात शेतकर्यांचे आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान होत आहे.www.konkantoday.com