
सावंतवाडी शहरातील मोती तलावात पर्यटनासाठी सावंतवाडीकरांच्या दिमतीला आणखी 6 बोटी दाखल.
सावंतवाडी शहरातील मोती तलावात पर्यटनासाठी सावंतवाडीकरांच्या दिमतीला आणखी 6 बोटी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे या बोटी बदकाच्या आकाराच्या बनविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता परिपुर्ण बोटींग क्लब लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.
माजी मंत्री तथा रत्नसिंधू योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून मोती तलावात पुन्हा एकदा बोटींग क्लब सुरू केला जात आहे. या पार्श्वभूमीवर याआधी चार बोटी आणल्या होत्या.यात दोन पॅडलच्या तर दोन मशीन बोटींचा समावेश होता. दरम्यान या बोटीत आणखी नव्याने भर पडली असून नव्याने सहा बोटी बदकाच्या आकाराच्या आणण्यात आल्या आहेत.
लवकरच हा बोटींग क्लब सुरू करण्याचा नगरपरिषद प्रशासनाचा मानस आहे.सावंतवाडी मोती तलावात पर्यटकांना आकर्षित करणारे नागपूर फाऊंटनच्या धर्तीवर म्युझिकल फाऊंटन लवकरच सुरू होणार आहे. साडेतीन कोटी रूपये यासाठी सिंधूरत्न महत्त्वाकांक्षी योजनेतून मंजूर करण्यात आले आहेत.या कामाला प्रत्यक्षात प्रारंभ झाला आहे.