कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन,अमेरिका, इंग्लंडसह भारतातील आबालवृद्ध सहभागी.

रत्नागिरी, ता. ५ : सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित कोंकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वात २१ किमी पुरुषांमध्ये अभिषेक देवकाते व महिलांमध्ये रजनी सिंग यांनी बाजी मारली. तब्बल १६०० स्पर्धकांनी ५, १० आणि २१ किमी धावण्याच्या या स्पर्धेत भाग घेऊन आनंदोत्सव साजरा केला. धावनगरी रत्नागिरी या उत्सवात रत्नागिरीकर उत्साहाने सहभागी झाले.गेल्या वर्षी प्रथम कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन झाल्यानंतर त्यानंतर धावण्याचा सराव अनेकांनी सुरू केला. वर्षभर हा सराव सुरू होता. रन फॉर बायोडायव्हर्सिटी ही संकल्पना घेऊन सलग दुसऱ्या वर्षीची स्पर्धा आज झाली.

रविवारी सकाळी मथुरा हॉटेलजवळील मैदानावर झुंबा डान्सने वॉर्म अपला सुरवात झाली. गुलाबी थंडीच्या वातावरणात धावपट्टूंचा उत्साह पाहण्यासारखा होता. रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित केली. याकरिता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचे बहुमोल सहकार्य लाभले.२१ किमीच्या मार्गावरील नदी, खाडी, दऱ्या, डोंगर- झाडी अशा निसर्गरम्य वातावरणात स्पर्धकांचा जोश वाढला. यंदा १६०० स्पर्धकांनी ५, १० आणि २१ किलोमीटरचे अंतर कापले. मार्गावरील सर्व गावांमधील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थ्यांनी ढोल-ताशे वाजवून या धावदुतांचे आगळेवेगळे जल्लोषात स्वागत केले.

अमेरिका, इंग्लंड या देशांतून भारतातील ८५ शहरांतून १६०० जणांनी नोंदणी केली होती. या स्पर्धेकरिता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचे मोलाचे सहकार्य लाभले.पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, माजी नगरसेवक बाळू साळवी, माजी नगराध्यक्ष राहल पंडित, लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी, सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक सूर्यकांत देवस्थळी व सौ. सुवर्णा देवस्थळी आणि अध्यक्ष प्रसाद देवस्थळी यांच्या उपस्थितीत स्पर्धेला झेंडा दाखवण्यात आला.२१ किलोमीटरसाठी धावपटू वेगाने धावू लागले. नाचणे, शांतीनगर, काजरघाटी, सोमेश्वर, वेसुर्ले, कोळंबे, फणसोप या वळणे, चढावाच्या मार्गावरून धावताना धावपटूंची मेहनत दिसून आली. वाटेत विविध ठिकाणी ग्रामपंचायत व अनबॉक्सने हायड्रेशन पॉईंटची व्यवस्था केली होती.

१० किमीसाठी ६.५० आणि ५ किलोमीटरसाठी ७.२० वाजता झेंडा दाखवून स्पर्धा सुरू झाली. वाहतूक पोलिसांनी अतिशय सुरेख पद्धतीने वाहतूक नियंत्रण केले. त्यांना रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि सुवर्णसूर्य फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. स्पर्धेला रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, रत्नागिरी नगरपालिका, अनबॉक्स उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार शेखर निकम, सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. फोटोग्राफर ओम पाडाळकर व सहकाऱ्यांची मदत मिळाली.

गेल्यावर्षी मी पहिल्यांदा मॅरेथॉनमधील पाच किलोमीटरसाठी भाग घेतला होता. त्यावेळी 30 मिनिटात पूर्ण करून वयोगटात पहिली आले होते. यावर्षी २१ किमीमध्ये भाग घेतला. ही शर्यत २ तास १३ मिनिटात पूर्ण करून गटात प्रथम क्रमांक मिळविला. केसीएमने ही संधी उपलब्ध करून दिली. प्रॅक्टिस रनमुळे त्या संधीचा सोने करता आले.

-मानसी मराठे, रत्नागिरी-

अमेरिका, इंग्लंडसह भारतातील आबालवृद्ध सहभागी

साडी नेसून महिला धावल्या * वय वर्ष ७ ते ८० या वयोगटातील आबालवृद्धांचा सहभाग * जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचाही सहभागी * आई-वडिलांसह मुले अशी अनेक कुटुंबे स्पर्धेत सहभागी * भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर धावदुतांची मांदियाळी * सेल्फी पॉईंट, आंब्याच्या आकारातील पदके * अंकिता पाटकर यांच्यामार्फत झुंबा सेशन * ग्रामपंचायतींचे बहुमोल सहकार्य * हायड्रेशन पॉईंटची व्यवस्था. * ढोल ताशाच्या गजरात स्वागत * भाट्ये किनारी पोलिस बॅंडने लक्ष वेधले.—–

. गटनिहाय गुणानुक्रमे निकाल असा ः

२१ किमी- *१६ ते ३५ वयोगट- पुरुष- अभिषेक देवकाटे, सिद्धेश बिर्जे, सौरभ रावणंगमहिला- सुरभी सावर्डेकर, केतकी घाडगे, सीमा जामदार

*३६ ते ४५ वयोगट- पुरुष- कपिल शर्मा, दादासो सातरे, सिद्धार्थ भागव.महिला- रजनी सिंग, योगिता पाटील, मनीषा भारद्वाज.

*४६ ते ५५ वयोगट- पुरुष- जयंत शिवडे, अनंत तानकर, सागर घोले.महिला- मानसी मराठे, सीमा बिजू, अपर्णा प्रभूदेसाई

*५६ ते ६५ वयोगट- पुरुष- सुरेश वेलणकर, विश्वनाथ शेट्ये, सीताराम उत्तेकर.महिला- दुर्गा हिमांशू कुमार सिल, रम्या नारायण, सुभाषिणी श्रीकुमार

*६५ वर्षांवरील गट- पुरुष- हेमंत भागवत, रजापान पी. पी., जगदीश जोशी.महिला- लता आलिमचंदानी—–

*१० किमी- १६ ते ३५ वयोगट- पुरुष- ओंकार बैकर, आदित्य धुळप, सिद्धेश मायंगडे.महिला- श्रृती दुर्गवळी, सीमा राठोड, युगंधरा मांडवकर.

*३६ ते ४५ वयोगट- पुरुष- संदीप पवार, अमित कुमार, दीपक वार्पे.महिला- श्वेता कुमारी, मनस्वी गुडेकर, विनया गुजर.

*४६ ते ५५ वयोगट- पुरुष- हितेंद्र चौधरी, बिपीन मोरे, राजेंद्र पवार.महिला- निशिगंधा नवरे, ज्ञानेश्री जोशी, सायली निकम.

*५६ ते ६५ वयोगट- पुरुष- अतुल बांदिवडेकर, यशवंत परब, विनय प्रभूमहिला- योगिता गुप्ता, निर्मला काळे, मधुरा चिंचाळकर.

*६५ वर्षांवरील गट- पुरुष- रोहित गुरव, सतीश दीपनायक, शिरीष देवस्थळी.महिला- प्रतिभा मराठे.——

*५ किमी- १६ ते ३५ वयोगट- पुरुष- दिपेश दिलीप, युवराज गावडे, ओंकार नले.महिला- रेणुका कुमारी, शीतल गावडे, आराध्य धुळप

*३६ ते ४५ वयोगट- पुरुष- उमेश खेडेकर, सुरेंद्र बंडबे, नीलम कांदे.महिला- सोनाली आयरे, सविता जगदाळे, तन्वी साळुंखे.

*४६ ते ५५ वयोगट- पुरुष- गणेशसिंग रजपूत, स्वप्नील साळवी, सचिन दाभोळकर.महिला- मंजिरी गोखले, वैदही कदम, रेश्मा मोंडकर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button