
मुंबई गोवा महामार्गाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे खासदार तटकरे यांचे आदेश.
मुंबई गोवा महामार्गाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश खासदार सुनिल तटकरे यांनी दिले आहेत. काळ नदी आणि गोद नदीवरील पुलाचे काम संथ गतीने सुरु असल्यानं सुनिल तटकरे संतापले.वाहतूक कोंडी आणि नागरीकांना होणारा नाहक त्रास, या प्रकरणी नागरीकांनी संतप्त भूमिका मांडली यानंतर सुनिल तटकरे यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी करणामध्ये माणगाव येथील काळ नदी आणि गोद नदीवरील पुलाचे काम संथ गतीने सुरु आहे. ज्यामुळे सुनिल तटकरे संतापले असल्याची माहिती आहे. माणगाव बायपासचे रखडलेले काम आणि माणगावमधील वाहतूक कोंडी, यामुळे नागरीक त्रस्त आहेत. या कोंडीच्या होणार्या त्रासाला कंटाळून नागरीकांनी आक्रमक भूमिका मांडली. नागरीकांनी भूमिका मांडल्यानंतर सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केलीय.




