
मुंबई-गोवा महामार्गावरील विद्युत खांबावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू.
मुंबई-गोवा महामार्गावरील महाड एमआयडीसी हद्दीतील आमशेतनजिक महावितरणच्या विद्युत खांबावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. संतोष दगडू जाधव असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तो दुचाकीने महाड येथून दापोलीच्या दिशेने येत असताना समोरील विद्युतखांबावर आदळला. अपघाताचे वृत्त कळताच महाड एमआयडीसीचे पोलीस घटनास्थळी पोहचले. अपघातामुळे काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती.www.konkantoday.com