
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचे नाव निश्चित
. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र ही नियुक्ती लगेच होईल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एप्रिलमधील निवडणुकांनंतर होईल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.चव्हाण हे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.
डोंबिवलीतून ते चौथ्यांदा विजयी झाले. मात्र, मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळाली नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूलमंत्रिपद मिळाले त्याचवेळी चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपद मिळणार हे स्पष्ट झाले. भाजपचे प्रदेश अधिवेशन १२ जानेवारी रोजी शिर्डी येथे होणार आहे. तेथे चव्हाण यांच्या नावाची घोषणा होणार का याची उत्सुकता आहे.