
मुंबईच्या मार्केटमध्ये भरधाव टेम्पोने 6 जणांना चिरडलं, महिलेचा जागीच मृत्यू.
मुंबईच्या घाटकोपर भागात भरधाव टेम्पोने पाच ते सहा जणांना चिरडलं आहे. घाटकोपरच्या चिराग नगर मार्केट परिसरात हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.रस्त्यावरून चालत असताना भरधाव येणाऱ्या या टेम्पोने पाच ते सहा जणांना चिरडलं. या टेम्पोच्या खाली एक महिला आली तिलाही टेम्पो फरफटत घेऊन गेला.अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला आहे. टेम्पो चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.




