
रवींद्र वायकर यांच्या खासदारकीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला.
खासदार रवींद्र वायकर यांचं टेन्शन वाढवणारी बातमी हाती आली आहे. रवींद्र वायकर यांच्या खासदारकीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.रवींद्र वायकर यांनी अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव झाला होता. यानंतर अमोल कीर्तिकर यांनी मतमोजीत घोळ असल्याचा आरोप करत रवींद्र वायकर यांना अपात्र करण्यात यावे, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली आहे. मात्र, कोर्टाने हा निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे रवींद्र वायकर यांची खासदारकीचं काय होणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.