
रत्नागिरी शहरात पाईपलाईन साठी खुदाई काम पूर्ण झाल्यावर सपाटीकरण नाही, नागरिक हैराण.
रत्नागिरी नगर परिषदेचे नवीन पाणी योजना पाईपलाईनचा कामाचा दर्जा आता नागरिकांसमोर उघड झाला आहे सततची पाईपलाईन फुटण्याच्या घटना वारंवार झाले आहेत रत्नागिरी शहराज्य स्तंभ समोर दोन दिवसांपूर्वी असाच पाईपलाईन फुटली होती नगरपरिषद कर्मचारी एखाद्या पाण्याची गळती काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाईपलाईन गळतीच्या ठिकाणी जेसीबी लावून खुदाई केली जाते त्यानंतर पाईपलाईन ला जॉईंट मारून तात्पुरती दुरुस्ती केली जाते मात्र त्यानंतर हा खड्डा भरण्यात येतो मात्र त्यांची कोणतीही लेव्हल करण्यात येत नाही.

त्यामुळे या रस्त्यावर जाता येताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहेत तसेच रस्त्याच्या बाजूला गाड्या उभा करण्यास नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत नगरपरिषदेने हे खोदाईचे काम पूर्ण झाल्यानंतर सपाटीकरण तातडीने करावी अशी नागरिकांची मागणी आहे