
१००० रुपये मुद्रांक शुल्क केल्याने जात वैधता प्रमाणपत्रासाठी आर्थिक भुर्दंड.
कुणबी या ओबीसी समाजातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रतिज्ञापत्र आणि शपथपत्र तयार करताना दोनशेऐवजी आता एक हजार रुपये मुद्रांक खर्चाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रतिज्ञापत्र व शपथपत्र साध्या कागदावर २० रुपयांचे कोर्ट फी स्ट्रॅम्प लावून स्वीकारण्यात यावे, अशी मागणी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ग्रामीण शाखा राजापूरचे अध्यक्ष दीपक नागले यांनी केली आहे.ही मागणी निवेदनाद्वारे राजापूर तहसिलदारांकडे करण्यात आली आहे. तसेच सर्वसामान्यांना सहन कराव्या लागणार्या आर्थिक भुर्दंडाकडे महसूल प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.www.konkantoday.com




