
धोपेश्वर तिठवली येथील आंबा बागेतील नेपाळी कामगारांची गळफास घेऊन आत्महत्या.
राजापूर तालुक्यातील धोपेश्वर तिठवली येथील आंबा बागेतील नेपाळी कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. राजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बिरेंद्र बहादूर बगाले मगर (वय २०, रा. मोहन्याल जि. कैलाली, नेपाळी, सध्या ः धोपेश्वर तिठवली, ता. राजापूर) असे मृत नेपाळी तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ८) दुपारी साडेतीनच्या सुमारास खबर देणार यांच्या मालकीच्या धोपेश्वर येथील आंबा बागेत निदर्शनास आली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेपाळी तरुणाने कोणत्यातरी अज्ञात कारणातून खबर देणार यांच्या मालकीच्या आंबाबागेत आंब्याच्या झाडाच्या फांदीला पिवळ्या रंगाच्या दुपट्याने गळफास लावलेल्या स्थितीत आढळला.