
रत्नागिरी शहरातील कर्ला येथील भरदिवसा घरात फिरून चोरट्याने तब्बल साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले.
रत्नागिरी शहरातील कर्ला येथील भरदिवसा घरात घुसून तब्बल साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले. याप्रकरणी संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची ही घटना बुधवार 4 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6.30 वा. कालावधीत घडली आहे.अलमुहीब अजगर सोलकर (29,रा. कर्ला उर्दु शाळेच्या पाठीमागे,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात फिर्यादी महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, बुधवार 4 डिसेंबर रोजी फिर्यादी महिला पतीसह आपल्या घरात असताना संशयिताने त्यांच्या घराच्या मागील बाजून घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील लाकडी कपाटातील लॉकरमधून सोन्याचा दोन हार, बांगड्या, मंगळसूत्र, चेन असा एकूण 3 लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणी फिर्यादी महिलेने या चोरी बाबत आजुबाजुला विचारपूस करुन रविवार 8 डिसेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली




