
रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे येथे कबड्डी खेळताना तरूणाला गंभीर दुखापत.
रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी येथे कबड्डी खेळताना तरूणाला गंभीर दुखापत झाली. मानस यशवंत आडिवरेकर (२३, रा. पूर्णगड, रत्नागिरी) असे जखमी तरूणाचे नाव आहे. गंभीर जखमी झालेल्या मानसला उपचारासाठी मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेची नोंद शहर पोलिसांत झाली आहे.मानस हा मिरजोळे लक्ष्मीकांतवाडीत होणार्या कबड्डी स्पर्धेत एका संघात सहभागी झाला होता. २ डिसेंबर रोजी स्पर्धेतील सामना खेळताना मानसच्या मानेला दुखापत झाली. यावेळी त्याला जिल्हा रूग्णालय येथे दाखल करण्यात आले. मानसला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याला उपचारासाठी प्रथम कोल्हापूर व आता मुंबईत पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. www.konkantoday.com