
चिपळूण विधानसभा राष्ट्रवादीच्या उमेदवार वादाप्रकरणी खासदार सुनील तटकरे यांनी चेंडू वरिष्ठांकडे ढकलला
चिपळूण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी करून राष्ट्रवादीचे नेते शेखर निकम हे इच्छुक असतानाच गुहागरचे राष्ट्रवादीचे आमदार भास्करराव जाधव यांनी देखील पक्षाकडे आपण चिपळूण मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असल्याचे सांगून अर्ज दाखल केला होता या प्रकरणात रत्नागिरीच्या दौऱयावर आलेले खासदार सुनील तटकरे यांनी मात्र या निर्णयाचा चेंडू वरिष्ठांकडे ढकलला आहे दोन वर्षांपूर्वी आपण या मतदारसंघातून प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांचे नाव जाहीर केले होते अशी कबुली त्यांनी दिली मात्र या प्रकरणातराष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदरावजी पवार याबाबत अंतिम निर्णय घेतील असे सांगून या वादावर तटकरी यांनी अधिक भाष्य करण्यास टाळले