गुहागर मार्गावर रूंदीकरणात लावलेली ३ हजार झाडे सुकून गेली.

गुहागर-चिपळूण महामार्गावर रामपूर ते गुहागरदरम्यान झालेल्या रस्ता रूंदीकरणानंतर दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली. मात्र ही लागवड केवळ देखावा ठरून पाण्याअभावी रोपे सुकून गेली. काही रोपो सभोवतालचे कुंपण तुटून जमीनदोस्त झाल्यानंतर महामार्ग वृक्षलागवड हक्क समितीने या विरोधात आवाज उठवत मागवलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने माहिती सादर केली आहे. त्यामध्ये एकूण विविध प्रकारच्या लागवड करण्यात आलेल्या १०,१०० रोपांपैकी ७,७१४ सद्यस्थितीत जिवंत असल्याचे नमूद केले आहे.गुहागर मार्गावर रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत असलेले महाकाय वृक्ष तोडण्यात आले.

रूंदीकरण पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची दुतर्फा रोपांची लागवड करण्यात आली. त्यांच्यासभोवती बांबूच्या काठ्या उभ्या करण्यात येवून नेटची जाळी बांधण्यात आली. या रोपांना टँकरने अधूनमधून पाणीही दिले जात होते. मात्र ही रोपो नंतरच्या कालावधीत सुकून गेली. तर काही रोपे जमीनदोस्त झाली. तसेच रोपांभोवतीच्या उभ्या काठ्या व कापडही गायब झाले होते. या लागवडीत आणखी एक फसवणूक म्हणजे नवीन रोपे लागवड केली आहेत असे दाखवून पूर्वीच्या जुन्या जगलेल्या झाडांनाच जाळीचे कापड गुंडाळून ठेवल्याचे प्रकारही पुढे आले आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button