
राजापूर मतदार संघातील दोन केंद्रांची मतमोजणी पुन्हा करा :– राजन साळवी
राजापूर :– दोन मतदान केंद्रांवरील मतमोजणीबाबत आपण आक्षेप नोंदवला असल्याची माहिती राजापूर मतदार संघातील उद्धवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांनी दिली. याबाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आपल्या आक्षेपाचे निवेदन दिले आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल दि. २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला. त्यातील निकालाबाबत आपल्याला संशय वाटत असल्याचे राजन साळवी यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.