
वन विभागाच्या पथकाने सावर्डेतील दोन कात फॅक्टरी मालकांना समन्स बजावले.
नाशिकच्या खैर तस्करीचा तपास करताना त्याचे संबंध चिपळूण तालुक्यातील सावर्डे, दहीवली परिसरातील कात फॅक्टरीशी असल्याचे पुढे आल्यानंतर २ दिवसांपूर्वी नाशिकवरून आलेल्या वनविभागाच्या पथकाने येथील कात फॅक्टरीवर धाडी टाकल्या. या धाडीत फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध खैरसाठा केल्याचे निदर्शनास आल्याने आणि त्याचा संबंध तस्करीशी असल्याचे निदर्शनास आल्याने एका फॅक्टरीचे गोडावून सील करण्यात आले. मात्र यातील फॅक्टरीचे मालक, कारवाईवेळी फरार असल्याने आता यातील दोन्ही फॅक्टरी मालकांना समन्स बजावण्यात आल्याचे वनविभागाच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले.www.konkantoday.com