
रत्नागिरी जिल्ह्यातील २ हजार ६५३ लाडक्या बहिणी लाभापासून वंचित.
विधानसभा निवडणुकीपूर्वी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे पैसे जिल्ह्यातील ४ लाख १८ हजार ८२४ लाभार्थी बहिणींच्या खात्यावर आचारसहितेपूर्वीच जमा झाले होते. मात्र काही त्रुटींमुळे जिल्ह्यातील २ हजार ६५३ बहिणींच्या खात्यात योजनेच्या आर्थिक लाभाचा एकही हप्ता जमा झालेला नाही. त्यांना योजनेचा लाभ कधी मिळणार याकडे त्या बहिणींच्या नजरा लागल्या आहेत.महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला राज्यभरात महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिल्याने महायुतीला मोठे यश मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या यशाचे श्रेय लाडक्या बहिणींना दिलं आहे. www.konkantoday.com




