
चिपळूण शहरात पूर्वीच्या भांडणाचा राग धरून एकाला मारहाण.
चिपळूण शहरात पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन दोघांनी एका तरुणास मारहाण केल्याची घटना शहरातील साई मंदिर परिसरातील रस्त्यावर शुक्रवारी घडली. यात तो तरुण जखमी झाला असून याप्रकरणी मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ब्रिजेश कालू शर्मा, दुर्गेश कालू शर्मा (दोघे- शंकरवाडी, मुळ-उत्तरप्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याबाबतची फिर्याद भीमसेन फुलचंद शर्मा (३५, सध्या-गाणे, मूळ-उत्तरप्रदेश) यांनी दिली असून या मारहाणीत ते जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भीमसेन शर्मा हे त्याच्या पुतण्याकडे त्यांनी दिलेले ३००० रुपये मागण्यासाठी गेले असता त्यावेळी ब्रिजेश शर्मा, दुर्गेश शर्मा हे दोघेजण तेथे आले. त्यांनी यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन ब्रिजेश याने भीमसेन यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच दुर्गेश याने लाकडी फळीने त्यांनी मारहाण व ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी ब्रिजेश शर्मा, दुर्गेश शर्मा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.