उद्धव ठाकरे आज कोकणात, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथे सभा.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे आज कोकणात तीन सभा घेणार आहेत. यामध्ये कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथे सभा होत असून या दौऱ्यामुळे ठाकरे विरुद्ध राणे वादाचा पुढला अंक लिहिला जाईल अशी जोरदार चर्चा कोकणात सुरु आहे.कणकवली आणि कुडाळ येथे नितेश राणे आणि निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोघांविरुद्ध कोकणात ठाकरेंनी उमेदवार दिले असून त्यांच्या प्रचारासाठीच ते आज दौरा करत आहेत. मात्र या दौऱ्यापूर्वीच खासदार नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना ‘जर-तर’च्या भाषेत इशारा दिला आहे. त्यामुळेच राणेंबद्दल उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.उद्धव ठाकरेंच्या सभेसंदर्भात काही दिवसांपूर्वी नारायण राणेंना पत्रकारांनीप्रश्न विचारला.

‘तुमच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत 13 तारखेला’, असं म्हणत पत्रकारांनी नारायण राणेंना प्रश्न विचारला होता. त्यावर नारायण राणेंनी, “माझी सभा मग साडेतेरा तारखेला असणार. माझी सभा असणार 100 टक्के,” असं उत्तर दिलं होतं. “त्यांची झाली की माझी (सभा) असणार. अपशब्द बोलला ना तर म्हणाव एकच रस्ता आहे. हेलिकॉप्टरने जाऊ नको, बाय रोड जाऊन दाखव,” असं थेट आव्हानच नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना या बहुचर्चित सभेपूर्वी दिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button